Home > News Update > C VOTER सर्वेनं उडाली खळबळ

C VOTER सर्वेनं उडाली खळबळ

भारतीय जनता पार्टीने 'मिशन ४५' स्वप्न भंगणार तर महाविकास आघाडीच्या जागा घटणार

C VOTER सर्वेनं उडाली खळबळ
X

आगामी लोकसभा निवडणूकीच्या कोणत्या पक्षाला कीती जागा मिळणा यापार्श्वभूमीवर c voter सर्वे जाहिर झाला आहे. या सर्वेने राज्यात खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीने मिशन ४५ नारा दिला आहे. मात्र, सी व्होटर सर्वेने महासयुतीचं स्वप्न सपशेल भंगणार आहे. महायुतील या ओपिनीय पोलनुसार २८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे

महाविकास आघाडीच्या जागा घटणार

महाराष्ट्रात महायुतीचा 28 जागांवर तर महाविकास आघाडीचा 20 जांगावर विजय होण्याची शक्यता या पोलनुसार समोर आली आहे, महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांना मिळून 16 जागा मिळतील तर काँग्रेस पक्षाला 4 जागा मिळण्याचा अंदाज एका सी व्होटर्सच्या ओपीनियन पोलमधून व्यक्त करण्यात आलाय.

भाजपचं 'मिशन ४५' च स्वप्न भंगणार ?

भारतीय जनता पक्षाला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीचा भाग असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळून 6 जागा मिळण्याची शक्यता आहे सर्वेनुसार वर्तवण्यात आली आहे. यामुळे भाजपने 'मिशन ४५' स्वप्न भंगणार असल्याचं चित्र सर्वेनुसार समोर आलं आहे.

Updated : 16 March 2024 5:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top