Home > News Update > डॉ. दाभोलकर स्मृतीदिन, अंनिसचे 'निर्भय मार्निंग वॉक'

डॉ. दाभोलकर स्मृतीदिन, अंनिसचे 'निर्भय मार्निंग वॉक'

डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत सकाळी 7 ते 9 या वेळेत 8 ठिकाणी निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले.

डॉ. दाभोलकर स्मृतीदिन, अंनिसचे निर्भय मार्निंग वॉक
X

पुण्यात मॉर्निंग वॉक करत असताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. परंतू अद्यापही त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. त्यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई मध्ये सकाळी ७ ते ९ या वेळेत ८ विविध ठिकाणी अंधश्रध्दा निर्मुलन समिती तर्फे निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले. घाटकोपर मध्ये भटवाडी ते सर्वोदय हॉस्पिटल व गणपती मंदिर ते घाटकोपर स्टेशन या दोन ठिकाणी; तर कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जोगेश्वरी येथे इस्माईल युसूफ कॉलेज व दहिसर येथे जरी मरी गार्डन या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यात आले.


(वरळी सीफेस माँर्निग वाँक काँमन मँनच्या पुतळ्यापासुन झाली.)

दादरमध्ये नायगाव मधील देवरुखकर मार्गावरील संविधान चौक येथून राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत पहिल्या मॉर्निंग वॉक ला सुरुवात झाली. पुढे वरळी सी फेसला आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन पुतळ्याजवळून दुसरा मॉर्निंग वॉक सुरू झाला व शेवटी शिवाजी पार्क ते चैत्यभूमी या मार्गावरून शेवटचा मॉर्निंग वॉक करून चैत्यभूमीवर मुंबईतील या सर्व मॉर्निंग वॉकचा समारोप करण्यात आला.




(घाटकोपर भाटवाडी ते घाटकोपर स्टेशन माँर्निग वाँक फोटो.)

यावेळी अनेक अं.नि.स. कार्यकर्ते, समविचारी, हितचिंतक व सुजाण नागरिक उपस्थित होते. अद्यापही डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही व हत्येच्या सुत्रधारांचाही शोध लागलेला नाही याबाबत उपस्थितांनी निषेध व्यक्त केला व जोपर्यंत खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ही मागणी नेटाने लावून धरू व याबाबत अधिकाधिक जनजागृती करू असा निर्धारदेखील व्यक्त केला.


(कुर्ला येते छत्रपती शिवाजी महाराज मैदान माँर्निग वाँक.)

यावेळी उपस्थित महाराष्ट्र अंनिसने मुंबईतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या या निर्धाराचे कौतुक केले तसेच हत्येचा तपास पूर्ण होऊन मारेकरी व सूत्रधार यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण याचा पाठपुरावा करत राहू असे आवाहनही केले. राज्यभरातून मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत व प्रत्यक्ष ईमेलद्वारे हत्येच्या तपासात होणारी दिरंगाई व त्याचा पाठपुरावा याबाबत निवेदने दिलेली आहेत असेही अं.नि.स.ने यावेळी सांगितले.


(चैत्यभुमी शिवाजी पार्क येते मुंबईतील माँर्निग वाँक घेण्यात आला होता.)

तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनानंतर जादूटोणा विरोधी कायदा झाला, पण त्याचे नियम अद्याप बनविले गेले नाही. ते त्वरीत बनवावे अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल, सामाजिक न्याय विभाग मंत्री धनंजय मुंडे यांना करण्यात आलेली आहे.


(जोगेश्वरी पूर्व स्टेशनजवळ इस्माईल युसुफ काँलेज जवळ माँर्निग वाँक करण्यात आला.)

Updated : 20 Aug 2021 12:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top