Home > News Update > चेंबूर सार्वजनिक वाचनालय पहाटे लागलेल्या आगीत जळून खाक

चेंबूर सार्वजनिक वाचनालय पहाटे लागलेल्या आगीत जळून खाक

चेंबूर सार्वजनिक वाचनालय आगीत जळून खाक झाल्यानं अनेक बहुमोल ग्रंथसंपदा नष्ट झाली आहे.

चेंबूर सार्वजनिक वाचनालय पहाटे लागलेल्या आगीत जळून खाक
X

ईशान्य मुंबई उपनगरातील सर्वात जुनं चेंबूर सार्वजनिक वाचनालय हे रविवारी भल्या पहाटे लागलेल्या आगीत जळून खाक झालं. यामध्ये तब्बल दहा ते पंधरा हजार दुर्मिळ मराठी इंग्रजी आणि बालसाहित्य जळून खाक झाली. 1960 साली या वाचनालयाची सुरुवात झाली होती तेव्हापासून आतापर्यंत पु. ल. देशपांडे ,व.पु. काळे, वि. वा. शिरवाडकर ,गो.नी. दांडेकर ,आचार्य अत्रे, अशा नामवंत लेखकांची दुर्मिळ साहित्य तसेच डॅनियल स्टील ,सुधा मूर्ती ,रॉबिन कूक, डॅन ब्राऊन अशा इंग्रजी लेखकांचं साहित्य देखील या आगीमध्ये जळून खाक झालं .

या वाचनालयामध्ये पंचवीस हजार पुस्तके ही वाचनासाठी उपलब्ध होती आणि दररोज या वाचनालयामध्ये पुस्तक प्रेमींची रेलचेल असायची परंतु अचानक लागलेल्या या आगीमुळे मराठी आणि इंग्रजी साहित्याचा अमूल्य ठेवा जळून खाक झाला त्यामुळे साहित्य प्रेमी कडून हळहळ व्यक्त केली जात आहे. हे वाचनालय पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी आता समाजाच्या सर्व स्तरातून आणि शासनाकडून देखील प्रयत्न व्हावेत अशी मागणी ग्रंथपाल पूजा तावडे यांनी केली आहे.

Updated : 25 Jan 2022 4:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top