मायावतींकडे पंतप्रधान पदाची योग्यता नाही – अरुण जेटली

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं, टीका, आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वच विरोधी पक्षांचे नेते टीका करण्यासाठी तूटुन पडले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,प्रियंका गांधी यांच्यानंतर आता मायावती यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केलाय. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मायावतीना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मायावतींच्या वक्तव्यांवरून त्या पंतप्रधानपदाच्या योग्यतेच्या नाहीत हेच स्पष्ट होतं, असं जेटलींनी म्हटलंय.

भाजपचे नेते, मंत्री, खासदार जेव्हा मोदींना भेटतात तेव्हा त्यांना भीती वाटते. मोदींनी जसं आपल्या पत्नीला सोडलं तसं आपले पती तर करणार नाहीत ना अशी भिती महिलांना वाटते असं मायावती यांनी म्हटलं होतं. मोदी हे अत्यंत घृणास्पद राजकारण करत असल्याची टीका मायावतींनी केली होती. यावर जेटली यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मायावतींची प्रशासकीय क्षमता, विचारांची क्षमता आणि प्रत्यक्षातलं आचरण हे अत्यंत खालच्या पातळीवर घसरलंय.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपमधील वाद सर्वश्रृत आहे. पण, हा वाद थाबायचं नाव घेत नाही. दोन्ही पक्षांतील नेते परस्परांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. मोदी लाट दिसत नसताना अमित शहा यांनी भाजपचा मोर्चा पश्चिम बंगालसारख्या राज्यात वळवला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची जाधवपूर येथे रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, शहा यांच्या रॅलीला परवानगी नाकारल्यामुळं आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलंय. तसंच  हेलिकॉप्टर उतरवण्यास देखील परवानगी दिली नाही. त्यानंतर आता भाजप निवडणूक आयोगाकडे धाव घेत तक्रार करणार आहे. भाजपनं लोकसभेकरता पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलं असून त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केलाय.