Home > मॅक्स ब्लॉग्ज > लढवय्या कामगार नेता

लढवय्या कामगार नेता

मुंबई शहर आणि गिरणी कामगारांचा लढा एक अजोड नातं आहे या लढ्याचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत त्यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्ताने ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी वाहिलेली शब्दांजली..

लढवय्या कामगार नेता
X

ज्येष्ठ व वादळी कामगार नेता डॅा. दत्ता सामंत यांची त्यांच्या घराजवळच निघृण हत्या झाली, त्या घटनेला आज २५ वर्षे झाली. कामगार आंदोलन व मुंबईची मानसिकता या दोघांनीही वेगळे वळण देणाऱ्या डॅा. सामंत यांच्यावर सतत टीका होत राहिली. मात्र त्यांची कामगिरी अजोडच होती. पेशाने वैद्यकीय व्यवसायात असलेले सामंत कामगार चळवळ व राजकीय जीवनात आले ते अपघातानेच. पण मुंबईतील कामगार चळवळीवर त्यांनी कायमचा ठसा उमटवला.

त्यांच्या नेतृत्वाखालीच मुंबईतील गिरणी कामगारांचा सर्वात प्रदीर्घ संप झाला. या संपाचे फलित हेच की मुंबईतील कापड निर्मिती उद्योग जवळपास बंद पडला व अडीच लाख कामगार कायमचे बेकार झाले; देशोधडीला लागले. डॅा. सामंतांनी कामगार आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना केली व विधान सभेत आणि नंतर संसदेतही प्रवेश केला. तिथे कामगारांचे प्रश्न त्यांनी वेशीवर टांगले डॅा. सामंत झंझावातासारखे सार्वजनिक जीवनात आले व तसेच अंतर्धानही पावले. त्यांच्या चळवळीत अनेक हिंसा झाल्या. हिंसेनेच त्यांचाही बळी घेतला.

Updated : 2 March 2021 4:00 AM GMT
Tags:    
author-thhumb

भारतकुमार

Print & TV Journalist,Political Analyst and formerMember of Parliament (RS). Worked in India & abroad and in English & Marathi. Opinions are strictly personal.


Next Story
Share it
Top