#JammuKashmir : सुरक्षा दलाच्या मोहिमेला यश, चकमकीत दहशवादी ठार

Courtesy : Social Media
0Shares
जम्मू काश्मीरच्या सोपोर येथे चकमकीत दोन दहशवाद्याला ठार मारण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. सुरक्षादलाला वडूराच्या पायीन गावात लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. सुरक्षादलांनी सर्व परिसराला घेरले आणि शोध मोहीम सुरु केली.
रात्रभर सर्च अभियान सुरु होते. सर्व परिसर सुरक्षादलांनी पिंजून काढला. अखेर दहशतवादी लपलेल्या ठिकाणी  घराला जवानांनी वेढा दिला. सुरक्षादलाच्या जवानांना पाहताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला यामध्ये एक दहशवादी ठार झाला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.