कॉंग्रेसच्या कवर पेजवर महात्मा गांधी

कॉंग्रेसच्या कवर पेजवर महात्मा गांधी

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुरामला देशभक्त म्हटल्यानंतरही भाजपने प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कोणती कार्य़वाही केली नाही. त्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्याबाबत देशात संताप व्यक्त केला जात असून कॉंग्रेससह बहुतेक पक्षांनी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने आज कॉंग्रेसच्या सर्व ऑफिसिअल अकांउंटच्या कवर पेजवर महात्मा गांधी यांचा फोटो ठेवत भाजपचा निषेध केला आहे.

दरम्यान प्रज्ञा ठाकूर यांनी या पुर्वी देखील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.