Lok Sabha 2019 : देशात 62 टक्के मतदान, तर पश्चिम बंगालमधील 80 टक्के मतदानाचा अर्थ काय?

0Shares
आज देशातील लोकसभेच्या सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडले. देशातील सहा राज्ये व दिल्ली मिळून ५९ मतदारसंघामध्ये आज मतदान झाले. २०१४ मध्ये या ५९ मतदारसंघापैकी भाजपनं ४४ जागा जिंकल्या होत्या. या जागा कायम राखण्याचं त्यांच्यापुढं आव्हान असणाराय.
केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, हर्षवर्धन, मेनका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे.

कुठे किती टक्के मतदान झाले?

सहाव्या टप्प्यात एकूण ६३.४३ टक्के मतदान पार पडले आहे तर प. बंगालमध्ये ८०.३५ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं आहे. दिल्लीत ५९.७४ टक्के, हरयाणात ६८.१७ टक्के, उत्तर प्रदेशात ५४.७२ टक्के, बिहारमध्ये ५९.२९ टक्के, झारखंडमध्ये ६४.५० तर मध्य प्रदेशात ६४.५५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
एकंदरीत पश्चिम बंगालमध्ये वाढलेले मतदान आणि उत्तर प्रदेशमधील गेल्या 5 टप्प्यातील मतदान 50 टक्क्यांच्या आसपास राहिलेले आताही हे मतदान 53 टक्के राहिले आहे… एकंदरीत या मतदानाचा अर्थ काय?