बाबासाहेबांच्या वस्तूंचा अमुल्य ठेवा

108
10
15Shares

औरंगाबादमधील मिलींद महाविद्यालयात बाबसाहेबांचे होते वास्तव्य

या वास्तव्यात त्यांनी वापरलेल्या वस्तू महाविद्यालयाने केल्यात जतन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक क्षेत्रातील योगदान ही महत्वपुर्ण आहे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यामातून त्यांनी महाविद्यालयं उभारली. औरंगाबाद मध्ये त्यांनी १९५० साली मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली. पुढे सहा वर्षांनी १९५६ साली बाबासाहेबांचे निधन झाले. पण या त्या शेवटच्या सात आठ वर्षात मिलींद महाविद्यालय सुरु करण्याच्या कामात त्यांचे इथे नेहमी जाणे येणे होत राहिले. या निमित्ताने मिलींद महाविद्यालयात त्यांचं मुक्काम होत असे. यातूनच त्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू आजही महाविद्यालयातील त्यांच्या निवासाच्या खोलीत जतन करुन ठेवण्यात आल्यात. दरवर्षी बाबसाहेबांच्या स्मृतीदिनी म्हणजे ६ डिसेंबरच्या दिवशी जनतेला पाहण्यासाठी खुल्या केल्या जातात. यात बाबासाहेबांनी त्यांच्या येथील वास्तव्यात वापरलेली भांडी, टॉवेल्स, हातरुमाल, रजई, शॉल, कॉट, खुर्ची, मेज आणि काही दुर्मिळ छायाचित्र यांचा समावेश आहे. बाबासाहेबांच्या स्मृतीदिनी औरंगाबादकर इथे भट देऊन बाबासाहेबांच्या या दुर्मिळ वस्तू पाहयला गर्दी करतात.