मोदीजी, 1988 ला तुमच्याकडे डिजीटल कॅमेरा होता का ?

न्यूज नेशन या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरून नरेंद्र मोदी चांगलेच अडचणीत आले आहेत.  बालाकोट सर्जिकल स्ट्राईक विषयी बोलताना त्यांनी ढगाळ वातावरणाबाबत जवानाला सल्ला देताना  ढगाळ वातावरण, पावसामुळं आपली विमानं पाकिस्तानी रडारपासून वाचू शकतातअसा अजब सल्ला दिला होता.
त्यानंतर या मुलाखतीतील अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 1987 -1988 मध्ये त्यांनी डिजीटल कॅमेरा आणि ईमेल चा वापर केल्याचं सांगत आहेत. मात्र, वास्तविकता काही वेगळीच आहे. भारतात इमेलची सुविधा विदेश संचार निगम लिमिटेड ने Videsh Sanchar Nigam Limited (VSNL) 14 ऑगस्ट 1995 सुरु केली. त्यातच विशेष बाब म्हणजे मोदींनी डिजीटल कॅमेराचा वापर केल्याचा उल्लेख या मुलाखतीत केला आहे.

मात्र, या संदर्भात देखील यावर आक्षेप घेण्यात आला आहे. अनेक नेटिझन्सने तेव्हा डिजिटल कॅमेरा नव्हता असं म्हटलं आहे. तर काहींनी तेव्हा डिजीटल कॅमेराचा भारतात वापर केला जात नव्हता असं सांगितलं आहे.