अप्पर वर्धा धरणाचे पाणी न सोडल्यास जलसमाधी घेऊ – आमदार यशोमती ठाकूर

0Shares

अमरावती जिल्ह्यात पाणी प्रश्न भीषण झाल्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे. आमदार यशोमती ठाकूर यांनी दुष्काळाच्या परिस्थितीत वर्धा नदी आणि मध्यप्रदेशातून पाणीसाठा जमा होत असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली होती.

विशेष बाब म्हणजे दुपारी 12 वाजता पाणी सोडण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रशासनाला दिले होते. त्यानंतर अचानक हा आदेश मागे घेतल गेल्यानं आता आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून जनतेला न मिळाल्यास आपल्या कार्यकर्त्यांसह अप्पर वर्धा धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा आमदार ठाकूर यांनी दिला आहे.

दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पाणी सोडण्याचा निर्णय झाला असताना भाजपा नेत्यांनी राजकारण करुन जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणत पाणी थांबवल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

दरम्यान काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पाण्याची मागणी केली आणि ही मागणी जिल्हाअधिकाऱ्यांनी पूर्ण केल्यानं, भाजपा नेत्यांनी त्याला विरोध केल्याचं सध्यातरी दिसून येत आहे. जर काँग्रेस आमदारांच्या मागणीवरून जनतेला पाणी सोडले गेले तर याचे सर्व श्रेय आमदाराला जाईल त्यामुळे त्यामुळे भाजपा नेत्यांनी राजकारण करून आदेशात बदल घडवून आणल्याचे चित्र आहे.

मात्र, श्रेयवादाच्या या लढाईत दुष्काळानं होरपळलेली जनता भरडली जात आहे.