भावी अधिकाऱ्यांकडून वैशाली येडे यांना निवडणूकीसाठी आर्थिक मदत

1661Shares
 शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध होऊ लागलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक सर्वार्थानं लक्षवेधी ठरतेय. विधवा महिला शेतकरी वैशाली येडे यांनाच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं उमेदवारी दिली आहे. यवतमाळ इथं झालेल्या ९२ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात वैशाली येडे यांनी आत्महत्या केलेल्य शेतकऱ्यांच्या विधवांच्या व्यथा मांडल्या होत्या.
सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. आजपर्यंत या विभागाकडे कोणीही पाहिले नाही. त्यामुळे शेतीचे प्रश्न व विधवा महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हा चिंतेचा विषय या मतदारसंघात महत्त्वाचा ठरतोय. या पार्श्वभूमीवर येडे यांना उमेदवारी देण्यात आली. येडे यांची लढत ही शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यासोबत आहे.
आमदार बच्चू कडूंनी स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली आहे. त्या भावनेतूनच वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी निधी म्हणून एमपीएससी समन्वय समितीनं २६ हजार ६५० रूपयांची मदत केली आहे. समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर, अनंता कदम, महेश घरबुडे, आशफाक शेख, पदमाकर होळबे, अरूण पाटील, दीपक शिरसाट यांनी स्वत च्या अभ्यासातील वेळ काढून वैशाली येडे यांच्यासाठी आर्थीक मदत गोळा केली आणि वैशाली येडे यांच्या खात्यात जमा केली.