…भारताची सर्वात फेमस बारगर्ल

सौ. सोशल मीडिया
0Shares

भारतासारख्या महाकाय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनं अनेकांना घडवलं तर कित्येकांना बिघडवलंही. होय, डान्सबार संस्कृतीनं कित्येकांना उद्धवस्त तर बोटावर मोजण्याइतक्यांना घडवलंही. यातल्या घडवण्यामध्ये सर्वात वर नाव होतं ते बारगर्ल तरन्नुम खान हिचं. देशातील सर्वात श्रीमंत बारबाला असलेल्या तरन्नुमचं नाव अनेक कारणांनी कायम चर्चेत राहिलं होतं.

1992 साली मुंबईत जातीय दंगली उसळल्या होत्या या दंगलीत अनेकांची घर उद्धवस्त झाली. अनेकांना रस्त्यावर आणणाऱ्या या दंगलीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून तरन्नुम सारख्या बारगर्लचा जन्म झाला. या जातीय दंगलीतून हातावर पोट असणाऱ्यांच्या आयुष्याचं गणितच बिघडवलं…. अंधेरीतील एका छोट्या कुटुंबातल्या तरन्नुमला आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहसाठी  कशी वाटचाल करावी लागली पाहुयात.

दंगलीतून जन्मली तरन्नुम खान

मुंबईतील अंधेरीत राहणाऱ्या तरन्नुमच्या वडिलांचं एक छोटं दुकान होतं. तरन्नुमसहित तिच्या कुटुंबात भाऊ बहिन मिळून एकूण 6 जण होते. या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुबांचा उदरनिर्वाह होत नव्हता… काटकसरी आणि हलाकीच्या परिस्थितीत जगणाऱ्या तरन्नुमचे आयुष्य 1992साली झालेल्या जातीय दंगलीनंतर कमालीचं बदललं. या दंगलीत त्यांच घर, दुकान सर्व नष्ट झाल्यामुळे तिचं कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं. याचा तरन्नुमच्या वडिलांनी चांगलाच धसका घेतला आणि त्यांना बिछाणा पकडला. वडिल धरणीला पडल्यानंतर आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिला कामाची गरज होती. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीने तिला बारडान्सर बनवलं.

तरन्नुम झाली बार गर्ल

16 वर्षाची असतानाचं तरन्नुम अंधेरीतल्या दीपा बार मध्ये डांस करु लागली. तिचा डान्स, तिचे सौंदर्य इतकं प्रभावी आणि भावणारं होतं की तिला बघण्यासाठी लांबून लोकं यायचे. तिच्या सौंदर्याची चर्चा इतकी झाली की थोड्याच दिवसातच मुंबईची सगळ्यात सुंदर बारगर्ल म्हणून तिला प्रसिद्धी मिळाली. इतकचं नव्हे तर तिच्यासाठी अनेक करोडपतींच्या अलिशान गाड्या रात्री दीपा बारकडे वळायच्या. तरन्नुमवर अनेकांनी लाखो रुपयांचा पाऊस देखील पाडला. तिला मुंबईतली सर्वात श्रीमंत आणि सुंदर बारगर्ल म्हणून म्हटलं जात होतं. संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिलेल्या बनावट मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी हा तरन्नुमचा निस्सीम चाहता होता. तेलगीने तिच्यावर एका रात्रीत तब्बल ९२ लाख रूपये उडवले होते. या घटनेची तेव्हा सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, २००५ मध्ये डान्सबार बंदीचा निर्णय झाल्यानंतर आयकर विभागाने तरन्नुमच्या वर्सोवा इथल्या अलिशान घरामध्ये छापा मारला त्यावेळी तिच्याकडे कोट्यवधी रूपयांची मालमत्ता सापडली होती. त्यानंतर तरन्नुम काही दिवस चर्चेत राहिली आणि पुन्हा जी गायब झाली ती सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार बंदी उठवल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.

 

 

3 COMMENTS

  1. I just want to say I am new to blogging and absolutely savored your web blog. Probably I’m likely to bookmark your site . You definitely have impressive articles and reviews. Bless you for revealing your web-site.

  2. I have actually been a yahoo customers for some years now. I am only beginning to utilize the tools which they offer, one of which being blog posts. I have created a blog and would love to know if my article are being seen by others. Otherwise after that does any individual recognize exactly how I obtain my articles review.

LEAVE A REPLY

10 − five =