Fact Check : शरद पवारांनी विजयमल्ल्याला २ हजार कोटीचे कर्ज मिळवून दिले का?

Courtesy : Social Media
0Shares
विजय मल्ल्यांना शरद पवारांनी दोन हजार कोटींचं कर्ज मिळवून दिलं. अशी एक बातमी एका मोठ्या अभिनेत्यानं आज व्हाट्सप गृपवर शेअर केली आहे. ‘ही बातमी २०१० ची असून शरद पवार यांनी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन विजय मल्ल्याला २ हजार कोटीचं कर्ज मिळवून दिलं. अशा आशयाची ही बातमी आहे.’ मात्र, ज्या वेळेला फॅक्ट चेक केलं, त्यावेळेला ही बातमी २०१० ची नाही. असं आढळून आलं. नवा काळ टायटलच्या शेजारी २०१० असं म्हटलेलं आहे. मात्र ‘नवाकाळ’ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर चेक केले असता…

ही बातमी ११ ऑक्टोबर २०१७ ची असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर बातमीचा खोटारडेपणा यावरुन लक्षात येतो. की ‘नवा काळ’ असं लिहिलं आहे. ‘नवा काळ’ असं लिहिलेली जी बातमी आहे. त्याच्या शेजारील बातमी ही नांदेडच्या निवडणुकीची आहे. आणि त्याबातमीमध्ये जर तुम्ही जवळ जाऊन पाहिलं तर त्या बातमी मध्ये २०१७ असा उल्लेख एका ठिकाणी आहे. त्याच बरोबर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख आहे.

सत्य काय?

जर ही बातमी २०१० ची आहे असा दावा या अभिनेत्याचा असेल तर २०१० मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हते. आमच्या टीमने फॅक्ट चेक केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलंय की ही बातमी २०१० ची नसून ही बातमी २०१७ ची आहे. तसंच ‘नवा काळ’च्या वेबसाईटवर ही बातमी उपलब्ध आहे. त्यामुळं व्हायरल केलेली बातमी हा फोटोशॉपचा वापर करुन व्हायरल केल्याचं आमच्या निदर्शनास आले. 
इ पेपर आणि सध्या व्हायरल होत असलेली बातमी (स्नॅप) आहे. जो एका अभिनेत्यानं पाठवलेला आहे. त्यातील बातमी शब्दनं शब्द खरी आहे. मात्र तारीख चुकीची आहे. त्यामुळे २०१७ मध्ये ही बातमी छापून आली होती. आणि २०१० मध्ये सर्वाना माहित होतं, तरी सुद्धा विजय मल्ल्याला कर्ज देण्यात आलं अशा पद्धतीचा एक संभ्रम निर्माण करण्याचा एक प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, ही २०१७ ची बातमी आहे