रंग आणि बेरंग लाइफची स्टोरी

24Shares
मुंबईमध्ये असलेल्या उंच इमारतीकडे पाहून जेवढे समाधान होते तेवढेच आता मुंबईच्या झोपडपट्टीकडे पाहून होते. मुंबईच्या घाटकोपर उपनगरमधील असल्फा झोपडपट्टीचे रूपांतर वेगवेगळ्या रंगात झाल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. चल रंग दे या सामाजिक संस्थेने यासर्व झोपडपट्ट्यानां रंग दिले आहे.
ज्या ठिकाणी रंग नसतो ते ठिकाण अत्यंत दुःखदायक असते. जीवनात अनेक आव्हानं येतात. अशी आव्हानं येणाऱ्या लोकांसाठी मी काय करू शकते ? या प्रश्नातूनच मला ही झोपडपट्ट्यांना रंगवायची कल्पना सूचली. थोडक्यात काय तर झोपडपट्ट्यांमधील लोकांना आनंदी व प्रसन्न ठेवण्याच्या कल्पनेतूच ‘चल रंग दे’ चा जन्म झाला. काही जणांना वाटेलही की फक्त रंग दिल्यानं काय फरक पडतो ? पण मला विश्वास आहे की, यामुळं झोप़डपट्टीवासियांच्या जीवनात आनंद तर मिळेलच पण शिवाय झोपडपट्ट्यांना नवी ओळखही मिळेल.
                           – दीपिया रेड्डी