भाजपा कार्यकर्त्यांची कॉंग्रेसच्या प्रचारफेरीत हुल्लडबाजी

भाजपा कार्यकर्त्यांची कॉंग्रेसच्या प्रचारफेरीत हुल्लडबाजी
0Shares
उर्मिला मातोंडकर यांच्या उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रचार सभेत भाजपा समर्थकांनी गोंधळ घातल्याची तक्रार मातोडकर यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात केली आहे. बोरिवलीत प्रचार करत असताना भाजपा समर्थकांनी यावेळी घुसून नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. या घटनेवर वक्तव्य करत उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाने सभेत गुंड घुसवल्याचा आरोप केला आहे.

 

काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर ?
प्रचाराची रितसर परवानगी घेऊन सभा घेतली जात होती. अत्यंत शांत मार्गाने सभा सुरु असताना भाजपाचे काही गुंड लोक आले होते. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. आमच्या लोकांनी आधी दुर्लक्ष केलं. पण नंतर त्यांनी अश्लील, विभत्स हावभाव करण्यास सुरुवात केली. त्यांनी महिलांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने मला मानसिक धक्का बसला असून यापुढील प्रचारासाठी मला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी मातोंडकर यांनी केली आहे. तर गोंधळ घालणारे कार्यकर्ते  हे सगळे भाड्याचे गुंड आहेत सामान्य लोकांना यासाठी वेळ नसतो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

6 + 1 =