डान्सबारचं अर्थकारण…

सौ. सोशल मीडिया
0Shares

राजरजवाड्यांच्या काळात मनोरंजनासाठी दरबारात खास नर्तकी असायच्या…त्या संगीतावर नाचत असत आणि राजासह अख्खा दरबार मद्यपान करत नृत्य आणि मद्याचा आस्वाद घ्यायचे…राजेशाही गेली आणि लोकशाही आली. तशी करमणूकीची साधनंही बदलत गेली. करमणूकीचा आस्वाद हा पैशांवर अवलंबून राहू लागला होता. अलीकडच्या मुंबईत डान्सबारच्या संस्कृती मोठ्या प्रमाणावर मुंबईवर फोफावली.

२००५ मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पुढाकार घेऊन डान्सबार बंदीच्या निर्णयावर सर्वांचं एकमत करून अखेर तो निर्णय घेतला. या डान्सबार बंदीच्या आधी मुंबईतल्या डान्सबारमधील वार्षिक उलाढाल ही सुमारे २ लाख कोटी रूपयांची असल्याचं या व्यावसायाशी निगडीत लोकांचं म्हणणं आहे. या उलाढालीमध्ये डान्सबारच्या आडून होणाऱ्या देहव्यापाराचा हिस्सा सर्वाधिक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. २००५ मध्ये जेव्हा डान्सबार बंदीचा निर्णय़ लागू झाला तेव्हाच मुंबईच्या डान्सबारची उलाढाल ही सुमारे ४२ हजार कोटी रूपये इतकी होती.

२००५ मध्ये जेव्हा डान्सबार बंदीचा निर्णय झाला तेव्हा मुंबईतच ८०० अधिकृत डान्सबार होते. शिवाय २०-२२ डान्सबार बेकायदेशीररित्या सुरू होते. या सर्व बारमध्ये तेव्हा साधारणतः ७५ हजार बारबाला काम करत होत्या. त्यापैकी काही बारबालांनी इतर व्यवसाय पत्करले तर सुमारे ३५ हजार बारबालांनी वेटर किंवा गायक म्हणून बारमध्येच कामाला सुरूवात केली. डान्सबारच्या आडून चालणाऱ्या वेश्याव्यवसायाची वार्षिक उलाढाल तेव्हा सुमारे ९५ हजार कोटी रूपयांची होती, असा अंदाज एका रिपोर्टमधून वर्तवण्यात आला आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच पुन्हा ही डान्सबार बंदी उठवल्याने पुन्हा एकदा मुंबईतल्या डान्सबारचं अर्थकारण सुरू होणार आहे.