काश्मीरमध्ये दोन दहशवाद्यांचा खात्मा

0Shares
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियान जिल्ह्यातील अवनीरा भागात चकमक सुरू झाली. या परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.