रवींद्र आंबेकर

वारे कुठल्या दिशेला वाहतायत…

किरीट सोमय्या यांचं तिकीट पक्षाने कापलं, किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन ज्याला तिकिट मिळालं त्या मनोज कोटक मोठ्या बहुमताने विजयी होईल म्हणून सांगतात, तिकडे शिवसेना भवनातून सर्व प्रवक्त्यांना ९ तारखे पर्यंत कोणी किरीट सोमय्या...

निवडणूक आयोगाचं मोदींना अभय आहे का?

पृथ्वीच्या कक्षेतील आपलाच उपग्रह पाडून भारताने आपली अंतराळ संरक्षण सिद्धता सिद्ध केली. ASAT मिसाइलच्या यशस्वी परिक्षणानंतर भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश झाला ज्याकडे ही क्षमता आहे. डिआरडीओ ने ही मोहीम यशस्वी केली, आणि पंतप्रधान...

परप्रांतियांच्या जीवावर महाराष्ट्र

इथला मजूर काम करत नाही म्हणून उत्तर भारतातून मजूर इथे आणले जातायत. 2-3 महिने ते इथे असतात. त्यांची राहण्याची सोय करावी लागते. जेवणाची सोय ते स्वतःच करतात. आटपाडीचे अमरसिंह देशमुख सांगत होते. भय्या म्हणजेच उत्तर...
#MumbaiBridgeCollapse : कुणीच राजीनामा देऊ नका

#MumbaiBridgeCollapse : कुणीच राजीनामा देऊ नका

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱा पूल आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. यात तीन जणांचा मृत्यु झाला तर ३४ जण जखमी झाले आहेत. आता मुद्दा हा आहे की, या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं...

निष्ठावंत कार्यकर्ते हीच खरी अडगळ

काँग्रेसयुक्त भाजपा ची पुन्हा सुरूवात झालेली आहे. काँग्रेस हा तकलादू आणि राजकीय सोयीचा विचार आहे, त्यावर त्यांच्याच नेत्यांचा, त्यांच्या मुलांचा विश्वास नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. भारतीय जनता पक्षाला पहिल्यापासून वैचारिकतेशी काही देणं...

मसुद मारला गेल्याचं पहिलं ट्विट कोणी केलं?

मी ट्वीटरचा पूर्ण ट्रेंड तपासला, पहिलं ट्वीट एका भाजपा समर्थक ट्वीटर हँडल वरून झालंय काल रात्री. त्याआधी एका भाजपा समर्थक लेखक-ब्लॉगरने ट्वीट केलं मसूद मेला म्हणून. ज्या ब्लॉगची लिंक व्हायरल झाली त्यावर ही एकच...

सर्जिकल स्ट्राइकचा राजकीय फायदा कुणाला?

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये चुळबूळ सुरू झाली. या कारवाईवर काय प्रतिक्रीया द्यायची इथपासून ऐन निवडणूकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईचा राजकीय अन्वयार्थ कसा निघेल...

युवासेनेची पाकिस्तानला थेट मदत…

युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांनी यवतमाळ मध्ये कश्मिरी युवकांना अपमानास्पद वागणूक देत मारहाण केल्याची घटना घडलीय. कश्मीरमध्ये तुझे नातेवाईक आमच्या जवानांना मारतायत असं बोलून या युवकांना थेट दहशतवादी असल्याचा टॅगच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे. युवासेना जे...

शिवसेना खरंच वाघ आहे का…

बाळासाहेब, उद्धव, आदित्य आणि काही पोस्टरवर रश्मी ठाकरे, नंतर जमलंच तर शिवाजी महाराज ( गरजेनुसार ) किंवा आणि पक्षाची निशाणी असा आटोपशीर कारभार. पक्षाचे नेते, उपनेते यांची लायकी ड्रम गेट पर्यंत कधी थांबून जाईल...

शिवसेना-भाजपाची युती, विरोधक खूश

भारतीय जनता पक्षासोबतची शिवसेनेची युतीची बोलणी संपली आहेत. भाजपासोबतच संसार करायचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. लोकसभा निवडणूकीतील जागा वाटपाचं सूत्र ही ठरलं असून शिवसेनेची आता कशालाच हरकत नाहीय. नरेंद्र मोदी सरकार वर सतत टीका...

बेरोजगारी फक्त लक्षण आहे, रोग त्यापेक्षा भयंकर

गेल्या 45 वर्षातील सर्वांत जास्त बेरोजगारी यंदा वाढल्याचं चित्र नॅशनल सँपल सर्वे च्या सर्वेक्षणातून बाहेर आलंय. हे होणं अपेक्षितच होतं. नोटाबंदीचे जे साइड इफेक्ट आपल्याला आसपास दिसत होते ते बाजूला सारून मोदी सरकार दररोज...

आपापल्या घरात गप्प बसा…

भारतीय लोकशाही समोरील सगळ्यात मोठा धोका, इव्हीएम टॅम्पर केली जाऊ शकतात असा दावा एका हॅकरने केला. खरं तर प्रश्न हा फक्त इव्हीएम हॅक करण्याचा नाहीय, प्रश्न तुमचं आमचं मत हॅक करण्याचा आहे. कुणी तरी...

बारबंदीचा निर्णय, पडद्यामागची कहाणी

‘आज महत्वाची घोषणा करणार आहे, रवी जरा मदत करा,’ आर. आर. पाटील यांनी सभागृहात प्रवेश करताना हळूच कानात सांगितलं. एखाद्या रिपोर्टरसाठी एवढी हिंट पुरेशी असते. मी अधाशीपणे विचारलं, ‘काय घोषणा आहे?’ आर. आर. पाटील...

भाजपाईंनो उत्तर द्या

भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी शस्रे, बंदूका सापडतात. धनंजय कुलकर्णी असं त्या पदाधिकाऱ्याचं नाव. इतका शस्त्रसाठा कशासाठी घरी ठेवला, हे विचारायचं- सांगायचं सौजन्य भारतीय जनता पक्षाचे कुठलेच नेते दाखवायला तयार नाहीत. गृहमंत्रीपद सांभाळणारे देवेंद्र...

साहित्यिक आहात की ‘मांडवली भाई’

नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यामागे बोलविता धनी कोणीतरी वेगळाच असल्याची बातमी सर्वप्रथम मॅक्समहाराष्ट्र ने दिली होती. श्रीपाद जोशी यांनी फक्त बैलासारखं इंग्रजी ड्राफ्ट केला होता. ड्राफ्ट करतानाच त्यांचा स्वाभीमान का नाही जागला, कारण...

अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चुकीचं टायमिंग

अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर चित्रपटाचं चित्रिकरण सुरू होतं तेव्हा पासून या चित्रपटातील काही सीन ‘चुकून’ व्हायरल करण्यात आले होते, आणि या चित्रपटाचे अभिनेते, आप मध्ये घुसून भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा राबवणारे कसदार अभिनेते अनुपम...

‘जी ललचाएँ, रहा न जाएँ’ राष्ट्रवादीची आत्मघातकी अवस्था

पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना नोटीसा बजावण्यात आल्या असून चौकशीअंती कारवाई करू अशी भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आपली उरलीसुरली विश्वसनीयता ऐन लोकसभा निवडणूकांच्या आधी पणाला लावली आहे....

सुपारी उलटी फिरली…

कधी कधी सेवकांची अतिस्वामीनिष्ठा ही स्वामीच्या जीवाशी येते. लहानपणी आपण राजाचं रक्षण करणाऱ्या माकडाची कहाणी ऐकली-वाचली असेल. माकडाच्या हातात तलवार देऊन राजा झोपी जातो आणि त्याला छळणाऱ्या माशीला पिटाळणताना माकड राजाचं नाकचं कापतो. अशीच...

कुठे नेताय महाराष्ट्र माझा

आरक्षणाचा आणि अॅट्रॉसिटीचा राग आम्ही दलितांवर काढतो असं सांगणाऱ्या भाग्यश्री नवटाके सध्या सोशल मिडीयावर व्हायरल आहेत. नवटाके जे काही बोलल्या हे त्यांच्यावर लहानपणापासून झालेल्या कु-संस्काराबरहुकूमच बोलतायत. त्या जे काही बोलल्या हा त्यांचा कबुली जबाब...

अशा प्रार्थनास्थळांचा बहिष्कार करा…

या देशामध्ये नारीला देवीचं स्वरूप मानण्यात येतं. एकीकडे नारीला आदिमाया, आदिशक्ती अशी विविध विशेषणं चिटकवून दुसरीकडे तिला साधं माणूस म्हणून अधिकार नाकारला गेलाय. हा देश विषमतेने भरलेला आहे. या देशाला ही विषमता गौरवशाली परंपरा...